TMC MLA Hamidul Rahman । पश्चिम बंगालमधील एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका जोडप्याला अनैतिक संबंधाच्या आरोपावरून मारहाण करण्यात येतीय. दाम्पत्याला बांबूच्या काठीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव तजमुल उर्फ जेसीबी असून तो स्थानिक तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेता आहे. कांगारू कोर्टाच्या निर्णयानंतर ही घटना घडली. याच मुद्द्यावरून विरोधकांनी टीएमसीला कोंडीत पकडले आहे.
रविवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगाल पोलिसांनी तजमुलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीय. त्याच वेळी, स्थानिक टीएमसी आमदाराने या घटनेवर वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो. चोप्राचे आमदार हमीदुल रहमान म्हणाले की, महिलेचे कृत्य समाजविरोधी आहे. रेहमानने आरोपींशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला. हा खेड्यापाड्याचा विषय असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.
मुस्लिम राष्ट्रातील जोडप्याला मारहाण TMC MLA Hamidul Rahman ।
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार,टीएमसीचे आमदार हमीदुल रहमान यांनी या घटनेचा संबंध मुस्लिम राष्ट्राशी जोडला असून त्यानुसार हा निर्णय देण्यात आल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “आम्ही या घटनेचा निषेध करतो, पण त्या महिलेनेही चुकीचे केले. तिने पती, मुलगा आणि मुलगी सोडून ‘दुष्ट प्राणी’ बनली. मुस्लिम राष्ट्रानुसार काही नियम आणि न्याय आहे. तथापि, आम्ही सहमत आहोत की हा प्रकार अत्यंत टोकाचा होता, आता याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.
विरोधकांनी ममता सरकारला घेरले TMC MLA Hamidul Rahman ।
त्याचबरोबर या संपूर्ण घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपसोबतच काँग्रेस आणि सीपीआय-एमनेही या दाम्पत्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या राजवटीचा हा कुरूप चेहरा आहे. असे म्हटले आहे.
हेही वाचा
सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ३० रुपयांची घट ; वाचा तुमच्या शहरात एलपीजीचे दर कितीने झाले कमी ?