पुणे – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित हस्ते राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली असून आशा पातोंड व स्नेहलता यनभर या दोन महिलांचे अर्ज प्रातिनिधिक स्वरुपात स्वीकारण्यात आले.
महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची राज्यात १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारी जिल्हा परिषदेतर्फे योजनेअंतर्गत १०० लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले. १५ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.