नगर, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेचा बहुतांशी महिलांना लाभ होणार आहे. परंतु वयोमर्यादा अटीमुळे १८ ते २० त्याच प्रमाणे ६१ ते ६५ वयोगटातील महिला वंचित राहणार आहे. त्याच प्रमाणे या योजनेसाठी डोमासाईल व जन्माचा दाखला व कुटुंबाची व्याख्या अडचणीचे ठरणार आहे.
या योजनेसाठी वयोमर्यादा १८ ते ६५ करून, डोमासाईल व जन्माच्या दाखल्याची अट रद्द करावी. तसेच कुटुंबाची व्याख्या पती पत्नी व लग्न न झालेली मुले अशी करावी, अशी मागणी श्रावणबाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
संजय निराधार योजनेतून १८ ते ६४ वयोगटातील निराधार स्री पुरुषांना दरमहा १ हजार ५०० रुपये तर ६५ वर्षांवरील स्री पुरुषांना श्रावणबाळ योजनेतून १ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. तर २१ ते ६१ वागतील महिलांना लाडकी बहिण योजनेतून १ हजार ५०० अनुदान दिले जाणार या मुळे ६१ ते ६४ वयोगटातील महिला या योजने पासून वंचित राहणार आहेत.
त्याच प्रमाणे या योजनेसाठी रेशन कार्ड प्रमाणे कुटुंब ग्राह्य धरल्यास बरेच कुटुंबांचे कूपन एकत्रित आहे. त्यामुळे कुटुंबाची व्याख्या पती पत्नी व लग्न न झालेली मुले, अशी आहे. हीच व्याख्या लाडकी योजने साठी ग्राह्य धरावी, अशी मागणी करण्यात आली.
जन्माच्या दाखल्याची जाचक अट
ग्रामीण भागातील बहुतांशी महिला या अशिक्षित आहे. तर काहींचे माहेर इतर राज्यातील आहे. राज्याचा १५ वर्षा पासुन रहिवाशी असावा, अशी अट आहे. पतीचे रहिवाशी दाखला ग्राह्य धरून लाभ दिला जावा, अशी मागणी निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.