A Y Patil । लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी खलबतं सुरु झाली आहेत. काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही नेतेमंडळी परिस्थितीनुसार पक्षबदल करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. याच चर्चांमध्ये कोल्हापुरातील राजकीय घडामोडींनीही वेग आलाय. कोल्हापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. कारण याठिकाणचे अजित पावर गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलीय.
ए वाय पाटलांनी घेतली शरद पवार यांची भेट A Y Patil ।
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या चर्चाना उधाण आले आहे. शरद पवार यांनी अलिकडच्या काळात दोन वेळा कोल्हापूरचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांत ए वाय वाटील यांचा सहभाग होता.
के पी पाटील यांनीही घेतली शरद पवारांची भेट
तर दुसरीकडे ए वाय पाटील यांच्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीकडून लढण्यावर के पी पाटील हे ठाम आहेत. कोल्हापुरातील राधानगरी-भुदरगडची जागा कोणत्या पक्षाकडे जाते यावर के पी पाटील यांचा निर्णय अवलंबून असेल. के पी पाटील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा जाहीर करणार आहेत. मी केवळ शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे मी माझी भूमिका बदलली असं होत नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.
समविचारी घटकांचा विचार घेऊन भूमिका जाहीर करणार
लोकांच्या मतांनुसार विधानसभेबाबत निर्णय घेता येईल. लोकांच्या इच्छेप्रमाणे उद्याची सर्व भूमिका आम्ही घेऊ. महाविकास आघाडीत जाण्याचं अजून ठरायचं आहे. जनतेच्या कोर्टातून काय येतं ते बघावं लागेलं. लोकांची, कार्यकर्त्यांची मतं समाजावून घेवून आणि मतदारसंघातील समविचारी घटकांचा विचार घेऊन भूमिका जाहीर करणार आहे.,”असेही त्यांनी यावेळी सांगितले.
…नेत्यांना भेटण्यासाठी बंधनं नसतात A Y Patil ।
शरद पवारांना भेटल्याबद्दल माझ्यावर कारवाई होण्याचा काही संबंध नाही. कारण नेत्यांना भेटण्यासाठी बंधनं नसतात. विधानसभा उमेदवारीबाबत आमदार आबिटकर यांनी दावा केला. तो त्यांचा प्रश्न आहे. ते सत्ताधारी पक्षात आहेत. पूर्वी एका पक्षात होते, नंतर दुसऱ्या पक्षात गेले, हा भाग त्यांचा आहे. पण मी विधानसभेच्या मैदानात उतरणारच आहे. जिल्ह्यातील नेतृत्वाची आमच्यावर माया आहे. ए. वाय. पाटलांनी काय करावं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ती मोठी माणसं आहेत. ते पक्षाचे प्रांत उपाध्यक्ष होते, असे के पी पाटील म्हणाले.
हेही वाचा
‘खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची अर्थसंकल्पावरून घोषणाबाजी