Subodh Bhave New Serial| अभिनेता सुबोध भावेने मराठी चित्रपटांसह मालिकांमध्ये देखील काम केले आहे. यापूर्वी सुबोध भावे ‘तुला पाहते रे’ या मालिकेत झळकला होता. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. विशेष म्हणजे सुबोधसोबत काम करण्याचे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. लवकरच त्याची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची प्रमुख भूमिका असणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ असे या मालिकेचे नाव आहे.
ही मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावेला खास भेटवस्तू दिली आहे. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. “सुरुवात गोड तर सगळंच गोड म्हणून माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. सुबोध सरांची मला आवडलेली आत्तापर्यंतची कामे आणि आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही छोटीशी भेटवस्तू,” असं कॅप्शन देत शिवानीने सुबोध भावेला भेटवस्तू देतानाचा फोटो शेअर केला आहे. Subodh Bhave New Serial|
View this post on Instagram
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा पहिला प्रोमो ८ मे रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सुबोध भावे आणि शिवानी सोनारीची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली होती. तसंच एआयचा वापर करून तरुणपणातल्या सुबोध भावेने सगळ्यांचं लक्ष वेधलं. मालिकाविश्वात ए.आय.वर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. 25 वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा या मालिकेत दिसणार आहेत. यात एक प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सुबोध भावेच्या नव्या मालिकेविषयी चाहते देखील उत्सुक आहेत.
हेही वाचा:
दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बची धमकी ; शाळा-हॉस्पिटलनंतर आता म्युझियमला मेल