पुणे : आज पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या दाखल झाल्या. दोन्ही पालख्या आज नाना पेठ (पुणे) या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत. या पालखींच्या दर्शनासाठी नाही असंख्य भाविक पुण्यात दाखल झाले आहेत. पोलिसांकडूनदेखील भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सिमला ऑफिस चौकात महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच वारकरी भक्तांना फराळ व पिण्याच्या पाणीचे बाटल्या वाटप करण्यात आले.
या वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी कार्यक्रमास भेट देऊन वारकऱ्यांना फराळ वाटप केला. या वेळी पी.म.टी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते, संजय गोतावळे,चैतन्य जगताप, सचिन काळे,दिपक जोशी, प्रशांत काळकुटे, तसेच संघटनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.