पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – इयता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसरया प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेरीची प्रवेश प्रक्रिया येत्या ३ जुलै पासून सुरु होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी १० जुलैला जाहीर होणार आहे.
पुणे व पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ९५ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यातील ८४ हजार १६५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ भरुन ते लॉक केले आहेत. ७० हजार २८२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-२ भरुन कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. कोटा प्रवेशासाठी ९ हजार १८० विद्यार्थ्यांनी अर्ज भ्ररले आहेत.
3४३ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी १ लाख २० हजार २६५ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यात कॅप अंतर्गत ९३ हजार ४४० तर कोटा अंतर्गतच्या २६ हजार ८२५ जागांचा समावेश आहे. पहिल्या नियमित प्रवेश फेरीच्या माध्यमातुन आत्तापर्यंत १३ हजार ९४१ व कोटा अंतर्गत ४ हजार ५५५ असे एकुण १८ हजार ४९५ एवढे प्रवेश झाले आहेत. १ जुलै पर्यंत या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
वेळापत्रक : दुसरी नियमित प्रवेश फेरी
३ ते ६ जुलै – नवीन विद्यार्थ्यांनी ऑनलइन नोंदणी करणे, अर्जाच्या भाग -१ मध्ये दुरुस्ती करणे, अर्जाच्या भाग-२ मध्ये महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे, मागील फेरीचे पसंतीक्रम बदलता येणार, अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य.
७ ते ९ जुलै – डेटा प्रोसेसिंग करणे, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे, विभागीय समित्यांकडून गुणवता यादी तपासणे.
१० जुलै – विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय निवड यादी व तपशील पोर्टलवर दर्शविणे, विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविणे, संबंधित महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांची यादी दर्शविणे, फेरीचे कट ऑफ जाहीर करणे.
१० ते १२ जुलै – महाविद्यालय लॉगिनमध्ये, प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे, अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास प्रक्रिया पुर्ण करणे, प्रवेश घ्यायचा नसल्यास विद्यार्थ्यांना पुढील फेरीची वाट पहावी लागणार,
प्रथम क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य, प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास त्यांना पुढील एका पुढील एका फेरीसाठी प्रतिबंध असेल. १२ जुलै – पुढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.