श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- जागतिक रक्तदान दिनानिमित्त १ जुलै रोजी आझाद मैदान, आगाशे सभागृहात सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, सीए असोसिएशन श्रीरामपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी रोटरी क्लब श्रीरामपूरचे नूतन अध्यक्ष डॉ.अजित घोगरे, सचिव उद्धव तांबोळी, इनरव्हिल क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष डॉ.शीतल घोगरे, सचिव डॉ. वंदना बोरा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश सदावर्ते, सचिव डॉ. संकल्प शिरसाठ,
इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उज्वला कवडे, सचिव डॉ मीनल फुलावर, आदी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे 102 वेळा रक्तदान करणारे संदीप शहा हे यावेळेस रक्तदान करणार आहेत.
शहरातील विविध संघटनानी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात जास्तीत-जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.