T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Score Update) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून आणि सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा इंग्लंड संघांच्या बाजूनं लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपांत्य फेरीतील या महत्वपूर्ण सामन्यात भारताला पहिला धक्का तिसऱ्या षटकात 19 धावसंख्येवर कोहलीच्या रूपानं बसला. रीस टोपलीने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात विराटला नऊ चेंडूत नऊ धावा करता आल्या. या संपूर्ण स्पर्धेत ओपनिंग करताना विराटचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे.
Five scores in the single digits for Virat Kohli 🫤#INDvENG | #T20WorldCup pic.twitter.com/OClTL1cc1T
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2024
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच कोहलीने 50 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. विराट कोहली टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांमध्ये (उपांत्य फेरीसह) केवळ 75 धावा करू शकला आहे.
विराट कोहलीचे टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील धावा
साखळी फेरी
आर्यलंड विरूध्द 01(05)
पाकिस्तान विरूध्द 04(03)
अमेरिका विरूध्द 00(01)
कॅनडा विरूध्द सामना रद्द
सुपर-8 फेरी
अफगाणिस्तान विरूध्द 24(24)
बांगलादेश विरूध्द 37(28)
आॅस्ट्रेलिया विरूध्द 00(05)
उपांत्य फेरी
इंग्लंड विरूध्द 09(09)