अहमदनगर – महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे. स्वीय साहाय्यक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह त्यांचा स्वीय साहाय्यक फरार झाले आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यामुळे शहर खळबळ उडाली आहे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख रुपयांमध्ये मिटवण्याचा ठरलं होते त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 24 रोजी तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणांमध्ये 19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे, संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी कारल्याने संयुक्त कारवाई केली आहे याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला, आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती मात्र उशीर झाला आहे पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.
तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचेही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे,
९ लाखांची केली होती मागणी
बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती.
आयुक्त फरार
लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे.