हिंजवडी , ( वार्ताहार ) आयटीनगरी हिंजवडी तील ०२ अनधिकृत हॉटेल, बार अँड रेस्टोवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बुलडोझर चालविण्यात आला. बुधवारी (दि. 26) दुपारी ०३.०० वाजल्यापासून निष्कासन कारवाई सुरू करण्यात आली.
अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे पथकाने महानगर आयुक्त राहुल महिवाल व अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे प्रमुख अनिल दोंडे यांच्या नेतृत्वाखाली साधारणता ७२०० चौ.फूट. क्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट व बार जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने जमीनदोस्त केले.
यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागतील अधिकारी यांचे मार्फत सदर ठिकाणी पुन्हा अनाधिकृत बांधकाम करू नये अन्यथा पुन्हा कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.
निष्कासन कारवाई करतेवेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, हद्दीतील आयटी परिसरातील उर्वरित सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई चालू राहील. असेही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भूगाव परिसरातील हॉटेल्सवर ही हातोडा…
भूगाव, भुकुम परिसरात जलाशयाला लागून असलेल्या अनेक हॉटेल्स बारवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर बुधवारी हिंजवडी आयटी परिसरात कारवाई मोहीम सुरू केल्याने हिंजवाडीकरांचे धाबे दणाणले आहेत.
त्यामुळे भुगाव पाठोपाठ आता हिंजवडी माण, मारुंजी , नेरे, कासरसाई परिसरातील हॉटेल्सवर ही कारवाई होणार की काय याचा धसका हॉटेल्सचालकांनी घेतला आहे.