मेढा, (प्रतिनिधी)- सांगवी तर्फ मेढा येशील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मैत्री ग्रुप जावळी यांच्यावतीने वह्या, रेनकोट, बॅग व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मैत्री ग्रुपचे ग्रामीण विभाग प्रमुख वैभव पवार, चेतन फरांदे, अभिषेक फरांदे, हर्षल खराडे, उदय विधाते उपस्थित होते. उद्योजक विठ्ठलशेठ धनावडे अध्यक्षस्थानी होते. मैत्री ग्रुपच्यावतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
युवा नेते व पवार उद्योग समुहाचे मालक एकनाथ पवार यांनी मैत्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रताप शेलार, अमर शेलार, शहर विभाग प्रमुख विष्णु धनावडे, ग्रामीण विभाग प्रमुख वैभव पवार आणि मैत्री ग्रुपचे सर्व सदस्यांचे विशेष स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले.
मैत्री ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू अशा प्रकारचे अनेक उपक्रम सातत्याने राबवीत असतात.
अशा विविध उपक्रमांची माहिती देऊन मैत्री ग्रुपचे कौतुक मुंबई पोलिस शशिकांत पवार यांनी प्रास्ताविकात केले. सुनील पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याधापक सुनील धनावडे, उपशिक्षिका सौ. शेख, अंगणवाडी ताई सौ. गुरव, सौ. केसरकर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी यदू पवार, नारायण पवार, सुरेश पवार, विलास पवार, सुरेश को. पवार, विष्णू पवार, किशोर जाधव, शिवाजी पवार, दीपक पवार, संग्राम पवार, जयश्री पवार, सौ. वर्षा पवार, सौ. भाग्यश्री पवार, सौ. उज्ज्वला पवार आदी उपस्थित होते.