Entertainment । बिग बॉस ओटीटी सीझन 3 च्या ताज्या एपिसोडमध्ये, अभिनेता रणवीर शौरीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. अरमान मलिकशी बोलतांना माजी पत्नी कोंकणा सेन शर्मासोबतच्या नात्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
तो म्हणाला,’मी घरी एकटाच आहे. म्हणजे माझा मुलगा अर्धा वेळ माझ्यासोबत असतो. आपल्या 13 वर्षांच्या मुलाबद्दल बोलताना त्याने सांगितले, ‘तो अर्धा वेळ आईसोबत आणि अर्धा वेळ माझ्यासोबत राहतो. आपल्या माजी पत्नीच्या संपर्कात असल्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की आम्ही फक्त मुलामुळे भेटतो.’
रणवीरने पुढे सांगितले, ‘मला दरवर्षी बिग बॉसकडून ऑफर येतात. दरवर्षी मी ते करू शकत नाही. पण या वर्षी विशेष म्हणजे माझा मुलगा यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आईसोबत महिन्याभरासाठी अमेरिकेला जाणार आहे आणि मला दुसरे काम नाही. दुसरे कारण म्हणजे मला स्क्रीन आणि फोनपासून दूर राहणे आवश्यक आहे कारण प्रत्येक गोष्ट मनोरंजन, स्क्रीन, कम्युनिकेशन स्क्रीनशी संबंधित आहे. त्यामुळेच मी थकलो आहे. सोशल मीडिया वापरत असताना. हे माझ्यासाठी दीड महिना निरोगी असेल. त्यामुळे इथं येण्याच ठरवलं.’
दरम्यन, कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी 2007 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघांनी 2010 मध्ये लग्न केले. यानंतर 2011 मध्ये त्यांचा मुलगा हारुणचा जन्म झाला. तर 2015 मध्ये रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी ट्विटरवर त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीने लिहिले की, रणवीर आणि मी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मुलाचे संगोपन करण्यासाठी मित्र आणि सह-पालक राहतील. आम्हाला तुमची साथ हवी आहे. धन्यवाद…’ असं म्हणत त्यांनी माहिती दिली होती.