मुंबई – विधानपरिषदेतील पाच सदस्य 21 जून 2024 रोजी निवृत्त झाले आहेत. या निवृत्त झालेल्या सदस्यांचा निरोप समारंभ उद्या, गुरुवारी दुपारी 3.00 वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे. विधानपरिषद सदस्य सुरेश धस, प्रवीण पोटे-पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया हे 21 जून रोजी निवृत्त झाले आहेत.
हा कार्यक्रम विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच दोन्ही सभागृहांचे सदस्यही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.