वाघापूर, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील आंबळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पंचायत समिती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका जयश्री धनंजय जगताप यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
करोना काळापासून आंबळे शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल नालंदा ऑर्गनाइज संस्था पुणे यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका म्हणून त्यांची प्रत्यक्ष सर्वेक्षणातून गावात येऊन गावातील विद्यार्थी, पालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करून त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये अनाथ मुलांसाठी केलेले उल्लेखनीय कार्य पाहून संस्थेकडून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला योजना अधिकारी संचालक सचिन अनंत कवळस, सहायक पोलीस निरीक्षक अधिकारी पांडुरंग वाघमारे, अभिनेता लेखक दिग्दर्शक विनोद वनवे व प्रसिद्ध उद्योगपती दाते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जयश्री जगताप यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.