पिंपरी, (प्रतिनिधी) – मोशी येथील बाजारपेठेत आलेल्या एका नागरिकाची दुचाकी अवघ्या अर्धा तासांत चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी घडली.
हनुमंत माणिक सुतार (वय ४४, रा. बर्गेवस्ती, चिंबळी, ता. खेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुतार हे मोशी येथील बाजारात सकाळी साडेसहा वाजता आले होते.
त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी मेन गेटच्या आतील बाजूस मोकळ्या मैदानात पार्क केली होती. सात वाजता ते पुन्हा आपल्या दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना आपली २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.