Sai Tamhankar| अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील उत्तम काम केले आहे. हिंदीतील ‘मिमी’ चित्रपटासाठी तिला अवॉर्ड देखील मिळाला आहे. अभिनय क्षेत्रात मोठे यश मिळाल्यानंतर आता सईने नवी सुरुवात केली आहे. सईने वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा केली आहे. तिने नवा व्यवसाय सुरू केला असून ‘मॅडम एस’ हा Merchandise ब्रँड लाँच केला आहे. याचा अर्थ ‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’ असा आहे.
सईने नवा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. याबद्दल बोलताना सई म्हणाली, ”हा ब्रँड लाँच करण ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती, पण फॅन्सच्या मनात फक्त राहायच नाही तर उरायचं आहे. म्हणून कायम आपल्या फॅन्स सोबत मनापासून जोडले जाण्याची संकल्पना होती. हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्ससाठी, प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करण यासारखा दुसरा मुहूर्त नाही.”
पुढे ती म्हणाली, “या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील यात शंका नाही आणि मी उद्योजिका फक्त पेपरवर झाली पण मानसिकरित्या ते काही पटत नाही तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल आणि असच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे”, असेही सईने म्हंटले. या ब्रँडचं नाव सईला अगदी जवळच्या मित्राने तिच्या पर्सनालीटी शोभेल असं सुचवले असल्याचेही तिने सांगितले. Sai Tamhankar|
View this post on Instagram
दरम्यान, सई ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. याशिवाय ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. Sai Tamhankar|
हेही वाचा:
मोठी बातमी ! अरविंद केजरीवाल यांना धक्का ; सर्वोच्च न्यायालयात जामीनावरील सुनावणीपूर्वी CBI कडून अटक