Nagpur News| नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मृत चिमणी आढळली आहे. या घटनेनंतर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. 3 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांना पोषण आहार दिला जातो. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. Nagpur News|
तसेच मृत पक्षी सीलबंद पाकिटात आला कसा? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातून अशी घटना समोर
पुण्यातही शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचे समोर आले होते. खेड तालुक्यातील बहुळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. वारंवार असे प्रकार समोर येत असल्याने मुलांच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
हेही वाचा :
Indian 2 Trailer । कमल हसन यांच्या इंडियन 2 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर ‘रिलीज’