Priya Bapat Photoshoot| अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयाने सिने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. तिच्या अभिनयासह सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहे. सिनेमासह तिने वेबसीरिज आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सध्या प्रिया हिमाचल प्रदेशात सोलो ट्रीपला गेली आहे. नुकतेच तिने तिचे निसर्गरम्य वातावरणातील फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हिमालयात ट्रेक आणि थंडगार पाण्यात डुंबतानाचे काही क्षण तिने शेअर केले. प्रियाने या सोलो ट्रीपमधील इतरही खास फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. निसर्गाचा आनंद घेताना, रम्य वातावरणात पुस्तक वाचतानाचे काही क्षण तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. यावेळी तिने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात तिचे सौंदर्य आणखीच खुलले आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडले आहेत. Priya Bapat Photoshoot|
View this post on Instagram
प्रियाने धर्मशाळा येथील टी इस्टेट्समध्ये हे फोटोशूट केले आहे. नयनरम्य वातावरण आणि प्रियाचा ग्लॅमरस लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रियाने सोशल मीडियावर तिच्या या सुंदर ट्रीपचा अनुभव देखील शेअर केला आहे. दरम्यान, ती सध्या उमेशसोबत ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग करत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. Priya Bapat Photoshoot|
हेही वाचा:
“पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार” ; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवार गटाचा इशारा