Pankaja Munde | Laxman Hake | OBC Reservation | Manoj Jarange : एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलयांनी मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे राज्यात वातावरण तापत आहे.
लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. अश्यातच, राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली असून राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीवेळी शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. दरम्यान अश्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांचे कौतुक केलं आहे.
पंकजा यांनी ट्विट करत लक्ष्मण हाके यांची पाट थोपटली आहे. तर पंकजा यांनी या माध्यमातून मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. “आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरी मध्ये पहा…वाह रे वाह..!’ या आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर
वडी गोदरी मध्ये पहा…वाह रे वाह..— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 21, 2024
लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी केली मागणी….
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे.
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 21, 2024
सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत.
शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे. असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.