IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात स्मृति मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 325 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. आता, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 326 धावा कराव्या लागतील.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने सलामी दिली, पण टीम इंडियाची धावसंख्या 38 असताना शेफाली 20 धावा करून बाद झाली. हेमलताही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहू शकली नाही, तिने 24 धावांचे योगदान दिले. एकवेळ भारताने 100 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या, मात्र येथून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या दोघींनी मिळून संघाची धावसंख्या 30 षटकांत 150 च्या पुढे नेली. पुढील 10 षटकांत 56 धावा झाल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या 40 षटकांत 207 धावांवर पोहोचली.
ICC ODI Rankings : स्मृती मंधानाने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप…
दरम्यान, मंधानाने मालिकेतील सलग दुसरे शतक झळकावले आणि हरमनप्रीतनेही तिचे अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या 5 षटकांत मंधाना आणि हरमनप्रीतने मिळून 58 धावा केल्या. पण 46व्या षटकात 120 चेंडूत 136 धावा करून स्मृती बाद झाली, या डावात तिने 18 चौकार आणि 2 षटकार मारले. मंधाना आणि हरमनप्रीतची 171 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर रिचा घोषने येताच आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. तर हरमनप्रीतने शेवटच्या षटकात 16 धावा काढत आपले शतक पूर्ण केले. हरमनप्रीत आणि रिचा घोष दोघींही नाबाद माघारी परतल्या. हरमनप्रीतने 88 चेंडूत (9 चौकार आणि 3 षटकार)103 धावा तर रिचाने 13 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकारासह 25 धावा केल्या. अशाप्रकारे भारतानं 325 धावसंख्येपर्यत मजल मारली. स्मृतीचं हे 7 वे आणि हरमनप्रीतचं एकदिवसीय कारकिर्दीतील सहावं शतक होतं. दक्षिण आफ्रिकेकडून मसाबता क्लासने 1 आणि मलाबा हिने सर्वाधिक 2 बळी घेतले.
Innings Break!
Talk about mighty batting display! 💪 💪
Cracking tons from Captain @ImHarmanpreet & vice-captain @mandhana_smriti! ⚡️ ⚡️#TeamIndia posted 325/3 on the board! 👏 👏
Over to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/j8UQuA5BhS #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/JnNLcDIEnp
— BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2024
मंधानाने साधली बरोबरी…
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर स्मृती मंधाना आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तिच्या आधी माजी कर्णधार मिताली राजने 211 डावात 7 शतके झळकावली होती. मात्र मंधानाने केवळ 84 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. मिताली राज आणि स्मृती मानधना यांच्या नावे आता प्रत्येकी 7 शतके आहेत. या बाबतीत हरमनप्रीत कौर दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे, जिने आतापर्यंत 6 शतके झळकावली आहेत.