Siddharth Jadhav Award | अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक केले जाते. सिद्धार्थचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या आगामी सिनेमाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत असतात. सोशल मीडियावर देखील तो नेहमीच सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकतंच सिद्धार्थला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये ‘बालभारती’ या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी’ पुरस्कार मिळाला आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे. “नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या “दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024” मध्ये आमचा सिनेमा “बालभारती” यासाठी मला जुरीचं “बेस्ट ऍक्टर” हे अवॉर्ड मिळालं. मनापासून आनंद होतो “बालभारती” सिनेमातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर appretiate केलं जातयं,” असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
“काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे. देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून ‘बालभारती’साठी अवॉर्ड मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,” असेही त्याने लिहिले आहे. तसेच त्याने शेवटी संपूर्ण टीमचे आभार देखील मानले आहेत. सध्या त्याच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सिद्धार्थचा बालभारती चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे स्फियरओरिजीन्स यांनी निर्मिती आणि नितीन नंदन यांनी दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा :
‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री ‘अमृता राव’