T20 World Cup 2024 (PNG vs UGA) : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये युगांडाने पापुआ न्यू गिनीचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात युगांडाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघ 77 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात युगांडाच्या संघाने 18.2 षटकांत लक्ष्य गाठले आणि 3 गडी राखून विजय मिळवला.
युगांडाच्या संघाची गोलंदाजी अप्रतिम होती. युगांडाचा संघाचा गोलंदाज फ्रँको एनसुबुगा (Frank Nsubuga) हा टी-20 विश्वचषक इतिहासातील सर्वात किफायतशीर चार षटकांचा स्पेल करणारा गोलंदाज ठरला आहे. (Most Economical Bowling Figures In T20 World Cup) पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात नसुबुगाने हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. एनसुबुगाने पापुआविरुद्ध असा विक्रम केला जो आजपर्यंत जगातील कोणताही गोलंदाज साधू शकला नाही.
43 year old Franco Nsubuga with the most economical four-over spell in the history of the ICC Men’s T20 World Cup. #WeAreCricketCranes #T20WorldCup #PNGvUGA @Im_AbhaySharma pic.twitter.com/XfjAqxuCQE
— Danny Nyeko🇺🇦 🚀 (@DNyeko) June 6, 2024
वास्तविक, पापुआ न्यू गिनी विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या 9व्या सामन्यात फ्रँको एनसुबुगाने इतिहास रचला. पापुआ न्यू गिनीविरुद्ध एनसुबुगाने किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 4 धावा देत 2 बळी घेतले. यादरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ॲनरिक नॉर्टजेचा विक्रम मोडला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एनरिक नॉर्टजेने 4 षटकांत 7 धावा देत 4 बळी घेतले होते. अशाप्रकारे फ्रँको एनसुबुगाने टी20 विश्वचषकात सर्वाधिक किफायतशीर चार षटक टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…
टी-20 विश्वचषकात सर्वात किफायतशीर 4 षटके गोलंदाजी करण्याच्या बाबतीत, श्रीलंकेचा अजंथा मेंडिस आता तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 2012 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 4 षटकात 8 धावा देऊन 6 विकेट घेतल्या होत्या.