तळेगाव दाभाडे, (वार्ताहर)- मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची तिसऱ्यांदा खासदारपदी विजयी झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिठाई वाटप करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा करण्यात आला.
या वेळी मावळ तालुका भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, उमाकांत कुलकर्णी, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या रंजनी ठाकुर, माजी नगरसेवक सचिन टकले, शोभा भेगडे, स्वप्निल भेगडे,
तनुजा दाभाडे, कोशाध्यक्ष विनायक भेगडे, रविंद्र साबळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा परदेशी, तळेगाव स्टेशनच्या अध्यक्षा निर्मला पोटे, सतीश पारगे, हिम्मत पुरोहित, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नितीन पोटे, अनिल वेदपाठक, राजेंद्र डांगे, सुधाकर घनशेट्टी, मृदुला भावे, अमित भागीवंत, गजानन राजहंस, स्मिता पोरे,
संध्या जाधव, ऋषिकेश सुतार, सोहम येवले, रोहन जाधव, गणेश उंडे, रूपेश गायकवाड, राहुल सूर्यवंशी, बाळासाहेब कडुसकर, अनिता दाभाडे, संजोगताता आगळे, तृप्ती भेगडे, विद्या भेगडे, मीना भेगडे, रूपाली भेगडे व शहरातील नगरसेवक, नगरसेविका, आजी, माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी फटाके वाजवून पेढे, लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.