Solapur Lok Sabha Constituency : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य घटले आहे.
प्रणिती शिंदे यांना 22 हजार 715 तर भाजपचे राम सातपुते यांना 32 हजार 876 मते मिळाली आहे. या फेरीमध्ये राम सातपुते यांना 10 हजार 161मते अधिक मिळाली. यामुळे या फेरीचे मताधिक्य घटल्याचे दिसून आले. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आघाडी घेतली आहे.
चौथ्या फेरीमध्ये राम सातपुते यांनी 10 हजार 161 मतांची आघाडी घेतली आहे. यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य घटले आहे. या फेरी अखेर एकूण मताधिक्य पाहता काँग्रेसच्या शिंदे यांना 3934 मताधिक्य राखता आले.