Lok Sabha Election Result 2024 Live । लोकसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमताचा आकडा सहज पार केला आहे, मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत इंडिया ब्लॉक 220 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. विरोधकांनी 295 जागा जिंकल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, अमेठीमधून काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा 15060 मतांनी आघाडीवर आहेत. शर्मा यांना आतापर्यंत 49947 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या स्मृती इराणी यांना 34887 मते मिळाली.