चित्रपटांच्या बाबतीत रणवीर सिंगचे सध्या बॅड लक सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याचे चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकले नाही. अनेक फ्लॉप चित्रपटांनंतर रॉकी आणि राणी हा चित्रपट गेल्या वर्षी हिट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर तो अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार होता पण हे सगळे थांबवण्यात आले आहे. रणवीरचे पाच मोठे चित्रपट बंद झाले आहेत.
रणवीर सिंग प्रशांत वर्माच्या राक्षस या चित्रपटात दिसणार होता. मात्र, क्रिएटिव्ह मतभेदांमुळे रणवीर स्वत: या चित्रपटातून बाहेर पडला. तर पद्मावत आणि रामलीलामध्ये संजय लीला भन्साळींसोबत काम केल्यानंतर रणवीर सिंग पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करणार होता. तो संजय लीला भन्साळीच्या बैजू बाजवामध्ये दिसणार होता पण आता रिपोर्टनुसार संजय लीला भन्साळी यावर लक्ष केंद्रित करत नाहीत. तो रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या लव्ह अँड वॉरवर लक्ष केंद्रित करत आहे.
मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान’ या शोवर चित्रपट बनत असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, नंतर मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगला मुख्य भूमिकेसाठी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळातच समजणार आहे कि नेमकं कोण ही भूमिका साकारणार आहे. करण जोहर मल्टीस्टारर चित्रपट तख्त घेऊन येत होता. या चित्रपटात रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट, करीना कपूर, अनिल कपूर, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर दारा शिखोहच्या भूमिकेत दिसणार आहे. पण कोविडमुळे हा चित्रपट रखडला.