चिंबळी – निघोजे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रूपाली नंदकुमार येळवंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निघोजे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून नम्रता येळवंडे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी सरपंच रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी रूपाली येळवंडे यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषणा सरपंच रमेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी व्ही. एल. गाडीलकर यांनी केली.
यावेळी उपसरपंच आशिष येळवंडे, रामदास येळवंडे, निलेश पवार, जितेंद्र आल्हाट, रिटाबाई सोनवणे, नम्रता येळवंडे, रुपाली येळवंडे, सुनीता शिंदे आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली येळवंडे यांचा सत्कार सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.