Football Turf Iron Tin Collapses | ठाणे शहरात शुक्रवारी सुरू झालेल्या पावसामुळे लोखंडी पत्रा फुटबॉल टर्फवर पडल्याने सात ते आठ मुले गंभीर जखमी झाले आहेत. गावंडबाग भागात फूटबॉल टर्फवर वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला आणि येथे खेळत असलेल्या काही मुलांना गंभीर दुखापत झाली. जखमी मुलांना ठाण्यातील बेथनी रुग्णालयामध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, गावंडबाग भागात फुटबॉल खेळाचे टर्फ आहे. या टर्फवर कोचिंगसुद्धा चालते. त्यामुळे येथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक मुलं फुलबॉल खेळण्यासाठी येत असतात. येथील टर्फवर वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यात तिथे फुटबॉल खेळणारी आठ मुले जखमी झाले आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहरात झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. अनेक भागात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले.
हेही वाचा:
निकालाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात; रवींद्र वायकर व निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल