देर-अल-बलान – इस्रायलने शनिवारी गाझाच्या उत्तरेकडील भागामध्ये केलेल्या माऱ्यामध्ये किमान 39 ठार झाले आहेत, असे पॅलेस्टिनी आणि रुग्णालयांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. रुग्णालयामधअये किमान तीन डझन मृतदेह आणले गेले, असे गाझा शहरातील अल-अहिली रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले. तर गाझा सिटीच्या पूर्वेकडील भागात तितक्याच संख्येचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे द पॅलेस्टिनी सिव्हील डिफेन्स या आपत्कालिन गटाने म्हटले आहे. ढिगाऱ्यांखाली आणकीन काही जण अडकले असण्याची भीती आहे. त्यामुळे ढिगारे उपसण्याचे काम अजूनही सुरू आहे, असे या गटाने म्हटले आहे.
हमासशी संबंधित दोन ठिकाणांना इस्रायलच्या विमानांनी लक्ष्य केले असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी इस्रायलने रफाहमधील शरणार्थ्यांच्या छावण्यांवर केलेल्या माऱ्यात किमान 25 जण ठार आणि 50 जण जखमी झाले होते. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इस्रायलकडून आतापर्यंत 37 हजार 400 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
लेबेनानमध्येही इस्रायलचा मारा
इस्रायलने केलेल्या एका स्वतंत्र हल्ल्यामध्ये लेबेनानच्या पूर्वेकडील बेका खोऱ्यात इस्लामिक ग्रुपच्या ठिकाणांना लक्ष्य केले गेले. यामध्ये अल-जमा -अल-इस्लामियाचा कमांडर ठार झाला. हा गट हमासचा अगदी जवळचा सुन्नी मुस्लिमाचा एक गट आहे. ठार झालेला कमांडर हा युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला या गटाचा सातवा कमांडर होता.