देर -अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायली सैन्याने रफाह शहराच्या उत्तरेकडील भागात केलेल्या जोरदार माऱ्यामध्ये २८ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्रायली सैन्याने हा मारा निर्वासित पॅलेस्टिनींच्या छावण्यांच्या तंबूंवर केला होता.
इस्रायलने जो भाग सुरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता, त्याच्या थोडे अंतर बाहेरच हा मारा करण्यात आला होता. भूमध्य किनाऱ्याजवळच्या मुवासी या ग्रामीण भागात अलिकडे काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने शरणार्थ्यांनी आय घेतला आहे.
या भागात इस्रायलच्या सैन्याने पूर्वीही मारा केला होता.आश्रय थावण्यांमध्ये लपून राहिलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हा मारा केला जात असल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
इस्रायलने रफाहमधील आपल्या कारवाईची तीव्रता वाढवली आहे. या शहरात गाझातील अन्य भागातून आलेल्या १० लाखांपेक्षा जास्त शरणार्थ्यांनी आय घेतला आहे.
आता तेथूनही पॅलेस्टिनींनी पळ काढायला सुरुवात केली आहे. मात्र आता या शरणार्थ्यांसाठी गाझातील कोणताही भाग सुरक्षित राहिलेला नाही, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.