आळंदी, (वार्ताहर) – श्री आळंदी धाम सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित भव्य रक्तदान शिबिरास २७५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच ३२१ नेत्र तपासणी व २११ नागरिकांनी आरोग्य व मोफत चष्मे वाटपाचा लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू, भोजन व्यवस्था, व नाश्ता देण्यात आला.
रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगी निरंजननाथ, नितीन गोरे, डॉ.राम गावडे, प्रकाश वाडेकर, सतीष मोटे, ज्ञानेश्वर वीर, सचिन गिलबिले, महेश शेवकरी, प्रकाश कुऱ्हाडे, डी. डी. भोसले-पाटील,मोहन महाराज शिंदे, किरण येळवंडे, सचिन काळे, सुनील काटे, धनंजय पठारे, डॉ.सुनील वाघमारे, राजेश दिवटे, रमेश वहीले,
आशिष गोगावले, वंदना आल्हाट, मनीषा थोरवे, संकेत वाघमारे राहुल थोरवे, योगेश पगडे, श्रध्दा थोरवे, मनोहर दिवाणे, अमित डफळ, साईनाथ ताम्हणे, नितीन ननवरे, किशोर देशपांडे,ज्ञानेश्वर गारकर,प्रदीप तळेकर,धनंजय मुंगसे,परसराम धनवटे, अक्षय पाटील,अजय पवार,सुयोग भालेकर, ज्ञानेश्वर घुंडरे,रोहिदास कदम उपस्थित होते.
या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी कमलेश हाॅस्पिटल, चव्हाण हाॅस्पिटल, धारा हाॅस्पिटल, सूर्या नेत्रालय तसेच वेदश्री तपोवन यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन करून श्री आळंदी धाम सेवा समितीचे कौतुक केले. सूत्रसंचालन अविनाश राळे यांनी, प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले. शशीकांत बाबर यांनी आभार मानले.