Eknath Shinde | Jayant Patil | Narendra Modi : नुकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. तसेच लाडली बहन योजना, वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर अशा मोठ्या घोषणा सुद्धा केल्या आता या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका केली जात आहे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आजचं बजेट म्हणजे चादर लगी फटने और खैरात लगी बटने, अशी टीका केली. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
यावेळेस बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ’जयंत पाटील म्हणाले की.. लोकसभा में चादर फट गई. अरे कुणाची चादर फाटली? मोदी तर पंतप्रधान झाले. फाटली कुणाची? हरलेले लोक पेढे वाटायला लागले येड्यासारखे. तुम्ही कशाला पेढे वाटताय? विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून? विजयराव, तुम्ही त्यांना सांगा तरी. जंग जंग पछाडल्यानंतरही तुम्ही मोदींना हटवू शकले नाहीत’. असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रताप सरनाईकक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली. यावेळी त्यांनी आधी भाषण केलेल्या प्रकाश सुर्वे आणि राम कदम यांचं कौतुक करताना “या दोघांचं प्रवचन तर अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल. त्यांना बरीचशी माहिती आहे त्यात”, अशी मिश्किल टिप्पणीही केली.